MCDC महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ ← सर्व प्रशिक्षणे

🍄 बटन व ऑयस्टर मशरूम प्रशिक्षण

4.7 ★6 Ratings & 6 अभिप्राय

खास दिवाळी निमित्य

⏱ 3 📍 पुणे
प्रवेश निश्चित करा →
बटन व ऑयस्टर मशरूम प्रशिक्षण

प्रशिक्षणाविषयी

कमी जागेत, उपलब्ध भांडवलानुसार सुरू करा स्वतःचा व्यवसाय!

मशरूम उत्पादन हा शेतीपूरक आणि स्वयंरोजगाराची संधी देणारा व्यवसाय आहे.

योग्य प्रशिक्षण, स्वच्छता, तापमान व आर्द्रतेचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती यांच्या मदतीने घरातील उपलब्ध जागेत किंवा छोट्या व्यावसायिक जागेतही मशरूम उत्पादन सुरू करण्याची तयारी करता येते.

हे प्रशिक्षण कोणासाठी उपयुक्त आहे?

शेतकरी, शहरी व ग्रामीण युवक-युवती, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), बेरोजगार तरुण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी ही एक उपयुक्त संधी आहे.

तुम्ही काय शिकाल?

  • बटन मशरूम उत्पादन: उत्पादनासाठी आवश्यक वातावरण, कंपोस्ट, बेड तयार करणे आणि मशरूमची निगा राखणे.
  • ऑयस्टर मशरूम उत्पादन: उपलब्ध कृषी अवशेषांचा वापर करून मशरूम उत्पादनाची पद्धत.
  • कमी भांडवलात व्यवसाय नियोजन: जागा, साहित्य, उपकरणे आणि आवश्यक गुंतवणुकीचे नियोजन.
  • उत्पादन ते विक्री: मशरूमची काढणी, साठवण, पॅकिंग, प्रक्रिया आणि बाजारपेठेतील विक्री.
  • स्वयंरोजगाराच्या संधी: स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करणे किंवा भविष्यात उत्पादनाचा विस्तार करणे.

वैशिष्ट्ये व मार्गदर्शक

  • वैशिष्टे ---
  • ✅मार्गदर्शक कवक शास्त्रज्ञ, मशरूम उद्योगातील उद्योजक
  • ✅आॅयस्टर मशरूमचे प्रात्यशिक ट्रेनिंग व बटन मशरूमसाठी खास प्लांट व्हिजीट
  • ✅मशरूमचे विविध मूल्यवर्धित उत्पादनाची माहिती
  • ✅NHM योजनेसाठी अधिकृत प्रमाणपत्र

शुल्कामध्ये समाविष्ट

🎁 चहा, नाष्टा, दु-सं जेवण, रहाण्याची व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र

📅 आगामी तुकड्या व नोंदणी

🗓️

नवीन तुकडीच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

आपला प्रवेश आगाऊ निश्चित करण्यासाठी चौकशी नोंदवा — नवीन तुकडी जाहीर होताच आम्ही आपल्याला कळवू.

📝 चौकशी करा 💬 WhatsApp वर चौकशी

⭐ प्रशिक्षणार्थींचे अभिप्राय

4.7★★★★★6 अभिप्राय
5★4
4★2
3★0
2★0
1★0
सायली अक्षय पाटील ★★★★☆
ईश्वरपूर, सांगली

Oyster mushroom ची पूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह तर बटन मशरूम ची माहिती क्षेत्र भेटीसह

उत्तम भरत झोले ★★★★★
वाकी, अकोले, अहिल्यानगर

"मी नुकतेच येथील मशरूम लागवडीचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि माझा अनुभव अत्यंत उत्तम होता. हे प्रशिक्षण अत्यंत माहितीपूर्ण, पद्धतशीर आणि व्यवसायभिमुख आहे. प्रशिक्षकांनी प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही गोष्टी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. मशरूमसाठी बेड तयार करणे, तापमान नियंत्रण आणि रोग व्यवस्थापन याबद्दलची माहिती खूप मोलाची होती. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांची शिकवण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. लागवडीसोबतच मार्केटिंग आणि व्यावसायिक गणिते यावरही चांगले मार्गदर्शन मिळाले. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. स्वतःचा मशरूम व्यवसाय सुरू करण्यासाठी हे एक उत्तम प्रशिक्षण आहे. नवशिक्यांसाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण सर्वोत्तम आहे. उत्तम व्यवस्थापन आणि सहकार्याबद्दल MCDC चे मनापासून धन्यवाद !"

यश हंसराज पगार ★★★★★
कळवण, नाशिक

पूर्वी मशरूम उत्पादनात काय चुका झाल्या व त्या दुरूस्त करून चांगल्या प्रकारे काम कसे करावे याची माहिती घेतली

manohar tapkir ★★★★☆
Mulkhed, Mulshi. Pune.

Button and oyester mushroom farming.
Basic information to succes in mushroom farming.
All parameters required for successful growth of mushroom.

Sahil Salim Mujawar ★★★★★
Sangli

सर्व उत्तम पण एक बदल अपेक्षित आहे

व्याखत्यांनी एखाद्या उप-विषयाबद्दल दिलेल्या वेळेला अनुसरून आपला PPT (प्रेजेंटेशन) मधे बदल करावेत

साध्या भाषेमध्ये सांगितले तर ज्या slides दिलेल्या वेळेत discuss करणे शक्य नाही त्या delete कराव्यात किंवा

वेळ शिल्लक राहिला तर त्याचे वेगळे presentation बनवून Additional Information म्हणून share करावे

Parag Dalvi ★★★★★
Pune

Very helpful

✍️ आपण हे प्रशिक्षण घेतले आहे? अभिप्राय द्या
📞 Call प्रवेश निश्चित करा